व्हिवा ७ नोव्हेंबर २०१७
माझ्यासमोर बसलेलं ते जोडपं अगदी त्रस्त होतं. त्यांचं नवीनच लग्न झालेलं होतं, पण ते दिसत होते मध्यमवयीन. शिवाय बोलताना ‘याचा मुलगा’, ‘हिची मुलगी’ असं बोलत होते. मी जरा गोंधळलेच. ‘एक मिनिट, मला जरा पहिल्यापासून नीट सांगाल का सगळं?’ मी म्हटलं. त्यातून मला कळलं ते असं - माधवी आणि गौरवचं लग्न होऊन सहा महिने झाले होते. दोघांचाही हे दुसरं लग्न. माधवीला नुकतीच कॉलेजमध्ये जायला लागलेली मुलगी होती आणि गौरवला साधारण त्याच वयाचा मुलगा होता. गौरवची नोकरी चांगल्या पगाराची होती. माधवीही जॉब करायची, पण लग्नानंतर या गावात शिफ्ट व्हायला लागल्यामुळे तिनं ती सोडली होती. लग्न करण्याआधी खूप विचार केला होता दोघांनी. ब-याचदा एकमेकांशी बोलून, आपलं छान जमतं याची खात्री झाल्यावरच त्यांनी पुढचं पाऊल उचललं होतं. आपापल्या मुलांना निर्णयात सहभागी करून घेतलं होतं. मुलांनी फार उत्साह दाखवला नाही पण विरोधही केला नाही. लग्न झाल्यावरचे सुरुवातीचे काही दिवस एकमेकांना जोखण्यात गेले. सगळेच एकमेकांशी जपून वागत होते.
‘मग आता काय झालंय? तुमचं पटत नाहीये का?’
या वयात लग्न केल्यावर काहीवेळा फार तडजोड करणं जमत नाही याची कल्पना असल्यामुळे मी विचारलं. ‘नाही हो, आम्ही एकदम कम्फर्टेबल आहोत. पण ही मुलं मात्र आम्हाला सळो की पळो करून सोडतायत. तरी चार चार वेळा विचारून घेतलं होतं आधी. त्यांची सोय व्हावी म्हणूनच हा निर्णय घेतला ना! पण कितीही केलं तरी त्यांना काही जाण नाही त्याची.’
अशी कुटुंबं पाहणं आता आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही. बदलत्या काळाबरोबर लग्नांची आणि मुलांची वेगवेगळी कॉम्बीनेशन्स दिसायला लागलीयेत. लग्नाच्या नेहमीच्या अपेक्षांमध्ये मुलं, करीयर, प्रॉपर्टी अशा नवीन गोष्टींची भर पडतेय. या लग्नांनंतर प्रत्यक्षात एकत्र राहायची वेळ येते, तेव्हा दोन्ही कुटुंबांना त्यांचे पूर्वीच्या घरामधले अनुभव आठवायला लागतात. एकमेकांच्या कितीतरी लहान-सहान गोष्टी खटकायला लागतात. मुख्यत: मुलं जेव्हा मोठी असतात, तेव्हा हे जरा जास्तच जाणवतं. लहानपणी नवीन नाती जोडणं जितकं सोपं जातं, तितकं आता ते अवघड वाटतं. त्यामुळे मुलांसाठीही हे नवीन नातं म्हणजे एक चॅलेंज असतं. त्यांच्या मनात आईबाबांबद्दल तऱ्हेतऱ्हेचे विचार यायला लागतात.
- माझे वडील बदललेत. त्यांची बोलण्याची पद्धत, शिस्त, दंगामस्ती करणं, सगळंच बदललंय. त्या नवीन लोकांवर ते जास्त प्रेम करायला लागलेत.
- काय गरज होती हिला लग्न बिग्न करायची? बाबांना ऑलरेडी विसरली की काय ही?
- माझ्या आईला आजकाल वेळच नसतो माझ्यासाठी. आधी मी यायच्या वेळी काहीतरी छान खायला करून माझी वाट बघत असायची, आता मात्र सारखी कामात असते.
- कुठल्यातरी अन-नोन व्यक्तीबरोबर घरात कसं राहायचं? मला नाही सवय अशी.
- माझ्या आईच्या जागी दुस-या कुणालातरी बघायला नाही आवडत मला. त्यापेक्षा आई नसलेली चालेल.
- त्यांनी मला काही शिकवलेलं मला आवडत नाही. मी ठरवीन मला काय करायचं ते. तुम्ही तुमच्या मुलाचं बघा.
- म्हणजे आता माझे खरे आई-बाबा कधीच एकत्र येणार नाहीत. आत्तापर्यंत मला जरा तरी आशा होती.
- माझ्या वडिलांना काय वाटेल? मला नाही वाटत हे नवीन वडील मला आवडतील असं.
बहुतेक मुद्दे निगेटिव्ह असतात. तुमच्या वयाची मुलं काहीशी स्वतंत्र झालेली असतात. पण अजून इमोशन्स, रिलेशनशिप्स, दोस्ती, सेक्शुअॅलीटी अशा बाबतीतला त्यांचा स्वत:चा गोंधळ पूर्णपणे सॉल्व्ह झालेला नसतो. नव्यानं ठाम मतं बनत असतात आणि ती एकदम टोकाची, तीव्र असतात. आपल्या आधीच्या आई किंवा वडिलांबद्दलची लॉयल्टी कुठलीही नवी नाती स्वीकारू देत नाही. शिवाय या वयात तुमचं सगळं लक्ष एकवटलेलं असतं तुमच्या स्वत:कडे. त्यात इतरांविषयीच्या विचारांना फार जागा नसते. त्यामुळे ‘या सगळ्या परिस्थितीचा मला त्रास होतोय, माझ्या हक्कांवर गदा येतेय’ एवढंच वाटत राहतं. मुलं धुमसत राहतात.
एक अनोळखी, रँडम व्यक्ती आपली खोली हक्कानं शेअर करतेय, आपल्या घरात राजरोसपणे वावरतेय, आपले नेहमीचे नियम बदलून काहीतरी वेगळेच नियम पाळायला लावतेय, आपल्या वडिलांवर हक्क गाजवतेय हेही तसं जडच जातं स्वीकारायला. मग त्या बाहेरून घरात येणा-या तरुण मुलाला/मुलीला किती ऑकवर्ड, उप-यासारखं वाटत असेल!
पण जसजसे आपण वेस्टर्न लाईफस्टाईल आपलीशी करतोय, तसतशी या नवीन नात्यांना आणि त्याबरोबर येणा-या कॉम्प्लीकेशन्सना सामोरं जायची सवय करण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. ती नाती कितीही स्ट्रेंज वाटली तरी!
Hi, this is Dr Vaishali Deshmukh. Welcome to this exclusive blog for teenagers, youth and parents. Let's explore the joys, surprises and concerns that teenage brings. You can read my articles and simple teen-friendly recipes here. Do keep a watch on must-visit places and events for teens . Also follow me on twitter @vaishaliteendoc
Thursday, 16 November 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
किशोरवय आणि जीवनकौशल्यं डॉ वैशाली देशमुख पूर्वप्रकाशित साप्ताहिक सकाळ समजा तुम्हांला कोशिंबीर करायची आहे. साधी टोमॅटो-कांद्याची. आणि...
-
We traveled in an ST bus from Nagpur to Gadchiroli. It was like entering into a different world altogether. The bus stand was full of tri...
-
A high protein, versatile, filling snack which can be a one dish meal in itself, thalipeeth is a unique staple of Maharashtra. The flour ca...
No comments:
Post a Comment