Tuesday, 6 June 2017

कार्यशाळा- पण मुलांची किंवा पालकांची नव्हे



     शाळेत मुलांशी आणि पालकांशी नेहमी बोललं जातं. पण आपल्या मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणा-या ड्रायव्हरकाका आणि ताई यांच्याशी बोलण्याचा अनुभव वेगळाच. खास त्यांच्यासाठी आखलेल्या या तीन तासांच्या कार्यशाळेत त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. रोज त्यांना किती समस्यांना तोंड द्यावं लागतं हे आपल्या लक्षातच येत नाही. त्या दृष्टीनं ही कार्यशाळा अनोखी होती.

     सुरुवातीला लाजणारे, गप्प गप्प असणारे ताई-काका खेळांमधून, गोष्टींतून हळूहळू मोकळे झाले. त्यांच्या कामाचं महत्त्व, त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य, व्यसनं, व्यायाम, आहार, वेळेचं नियोजन अशा कितीतरी गोष्टींचा यात समावेश होता. विशेषत: स्कूल बसेस साठी असलेल्या वाहतुकीच्या नियमांची काही फिल्म क्लिप्स वापरून विस्तृत चर्चा झाली. 'Good touch, bad touch' , त्याविषयी पाळण्याच्या मर्यादा, त्याचे होणारे दूरगामी परिणाम हाही एक प्रमुख विषय होता चर्चेचा.
     शिवाय प्रभावी संवादसाठी उपयुक्त तंत्रं, त्यात नियमितपणे येणारे अडथळे यावरही बराच उहापोह झाला. हा संवाद मुलांबरोबर कसा करायचा, पालकांबरोबर कसा करायचा आणि शाळेच्या अधिकाऱ्यांशी कसा करायचा याचे वेगवेगळे अभिनव मार्ग सहभागींनी छान सांगितले. विद्यार्थ्यांची सुरक्षित ने-आण करण्याच्या दृष्टीने या दोन बाबी फार महत्त्वाच्या. सर्वसाधारणपणे तोंड द्यायला लागणारे मुलांचे आजार म्हणजे चक्कर येणे, घोळणा फुटणे, जखम होणे, फीट येणे आणि ताप. त्यावर काय पावलं उचलायची आणि कोणते प्रथमोपचार करायचे ते त्यांना शिकवले.

     शेवटी त्यांचे गट करून एका मोठ्या पोस्टर पेपर वर त्यांना चित्र काढायला सांगितलं. त्यावर मुलांना द्यायच्या सूचना आणि बस शी संबंधित चित्र काढायची होती. तिथेही हाच अनुभव आला. आधी खाली बसायलाही तयार नसलेले लोक उत्साहानं, हिरीरीनं चित्र काढण्यात सामील झालेले दिसले.

    नुसता काहीतरी प्रॉब्लेम झाल्यावर ताई-काकांना दोष देण्यात अर्थ नाही. त्यांना प्रशिक्षित करायचीही गरज आहे.
तुमचं काय मत?


3 comments:

  1. Nakich taii ani kakana prashikshan dyalach hava...

    ReplyDelete
  2. Thanks Aditi!
    Let's hope more and more people agree!

    ReplyDelete
  3. Training programs should be introduced & with d help of school we can implement it. I am ready to do active participation

    ReplyDelete

  Adolescence and addictions Dr Vaishali Deshmukh Adolescents are all those who are between 10 and 19 years of age. Adolescents are in...