Wednesday, 9 July 2025

 

Adolescence and addictions

Dr Vaishali Deshmukh

5 social factors that contribute to ...Adolescents are all those who are between 10 and 19 years of age.

Adolescents are in a transition and undergo major rapid physical, emotional and thinking changes. The body changes from that of a child to that of an adult male or a female. Adjusting to this visible change can be daunting for them.

Even more dramatic changes are happening within the adolescent brain. The thoughts are becoming more and more mature. The front part of the brain, called the prefrontal cortex, is the manager of all the emotions and decisions. This part takes the longest time to mature, up to 25 to 30 years. Till then, the emotions take the upper hand. The thoughts and behaviours are impulsive. They cannot think about very long-term consequences and think mostly in black and white. The reward centre is always hungry for achievement, appreciation and attention. At this stage, they also need to form their own social circle as part of becoming an independent adult.

All these developmental happenings provide some peculiar characteristics to adolescents.  Here are some of them:

„  Risk taking behavior

„  Impulsiveness

„  Curiosity and Experimentation

„  Instant gratification

„  Need to socialize

„  Peer preference/ peer pressure

As you can imagine, each of these characteristics have multiple implications on different areas of their lives.

„  Addictions

„  Technology

„  Law

„  Implications on counselling

„  Mental health

„  Relationships

„  Education

„  Sex

„  Career

Let’s talk about our main topic today, addictions. Yes, smoking, drinking and drug abuse are the three major addictions that we are worried about.

They are characterised by tolerance (need of higher dose to achieve same effect). Habituation (repeated craving for the substance) and withdrawal (ill effects if the substance is not consumed). We do see similar steps when it comes to screen use. (Social media, Gaming, Porn, Gambling- online/offline)

Multiple factors act as protective as well as risk factors.

The effects of addiction are not just physical or mental, but also social and economic.

„  Unsafe sex

„  Driving under influence

„  Crime, Legal troubles

„  School failure (loss of concentration and cognition, IQ)

„  School dropout

„  Relationships

„  Loss of interest in normal healthy activities

„  Mental health problems, suicides

„  Economic problems

 

Prevention and treatment: prevention is important during adolescence as there are far reaching effects at this age. Giving information, creating awareness, providing alternatives to substance abuse to have fun are some of the interventions.

„  Multiple levels- Individual, Family, Society

„  Multidisciplinary approach: physician, mental health professionals, occupational therapists, teachers, peers, family

 

Our role is that of a gatekeeper, a role model and a solid support giver. These are some of the things that we can do.

„  Non-judgmental attitude

„  Communication

„  Providing alternatives

„  Creating a non-materialistic environment

„  Identifying red flag signs

„  Life skills

Tuesday, 24 June 2025

 

किशोरवय आणि जीवनकौशल्यं

डॉ वैशाली देशमुख

पूर्वप्रकाशित साप्ताहिक सकाळ

समजा तुम्हांला कोशिंबीर करायची आहे. साधी टोमॅटो-कांद्याची. आणि त्यासाठी शून्यातून सुरुवात करायची आहे. तर काय काय करायला लागेल? सर्वप्रथम त्यासाठी लागणाऱ्या घटक पदार्थांची यादी करायला लागेल. मग भांडी वगैरे इतर काय काय साहित्य लागणार, ते घरात आहे का हे पाहायला लागेल. किती लोकांसाठी करायची आहे हे बघून तितके टोमॅटो आणि कांदे आणायला लागतील. तयार करायला किती वेळ लागेल याचा अंदाज घ्यायला लागेल. आपल्या बाकीच्या कामातून कधी करता येईल आणि खाण्याच्या किती वेळ आधी ती बनवायची आहे हे पाहून ती वेळ ठरवायला लागेल. मग कांद्याचे आणि टोमॅटोचे योग्य आकारात तुकडे करायला लागतील, फार मोठे नाहीत, फार लहान नाहीत. कोथिंबीर चिरायला लागेल. शेंगदाणे आणून ते भाजून त्याचं कूट करायला लागेल. मग त्यात किती साखर, मीठ घालायचं याचा अंदाज घेऊन ते घालायला लागेल. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून, हव्या त्या भांड्यात काढून ठेवायचं, त्यावर झाकण ठेवायचं. कचरा गोळा करून ओल्या कचऱ्यात टाकायचा. ओटा स्वच्छ करायचा. चव घेऊन बघायची. खाताना कुणी त्याला नावं ठेवतील, कुणी नावाजतील. नंतर उरलेली कोशिंबीर काढून फ्रीजमधे ठेवायची.  

आता सवयीनं तुम्ही कदाचित या सगळ्या पायऱ्या सहजपणे, विचार न करता पटापट करत असाल. हेच काम जर तुम्ही एखाद्या नवख्याला सांगितलं, तर काय होईल? ऐनवेळी ‘हे कुठेय, ते नाहीये घरात’ वगैरे धावपळ, आरडाओरडा, चिडचिड, जेवायची वेळ झाली तरी पदार्थ तयार नसणं, प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी झालेली कोशिंबीर, मीठ कमी-जास्त, पदार्थ बिघडणं, नंतर पसारा तसाच, कुणी नावं ठेवली तर हिरमुसणं, कचऱ्याचं वर्गीकरण न करणं, उरलेली कोशिंबीर तशीच राहून दुसऱ्या दिवशी खराब होणं – यातल्या एक किंवा अनेक गोष्टी घडतील.

याचं कारण असं की कोशिंबिरीसारखी अगदी साधी गोष्ट करायची झाली तरी त्यासाठी पाककौशल्य तर लागतंच पण वेळेच्या नियोजनापासून ते प्रमाणाचा अंदाज घेण्यापर्यंत; भावना हाताळण्यापासून ते दूरगामी विचार करण्यापर्यंत, इतरही कितीतरी कसब लागतं. मग गुंतागुंतीच्या गोष्टींसाठी तर किती काय काय लागत असेल! आपल्या दैनंदिन कामांच्या पूर्ततेसाठी, त्यांच्या नियोजनासाठी, त्याबरोबर येणाऱ्या भावनांच्या हाताळणीसाठी ही जी कौशल्यं लागतात ती शाळेच्या कुठल्या अभ्यासक्रमात शिकवत नाहीत. ही जीवनकौशल्यं किशोरवयात फार महत्त्वाची असल्याचं आढळून आलंय. आणि त्याला कारण आहे त्यांचं धेडगुजरी, अपरिपक्व वय; लवचिक, संस्कारक्षम मेंदू; आणि त्यांच्यासमोर उभी ठाकणारी अभूतपूर्व आव्हानं!  

भारतात १० ते १९ या वयातल्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के (२५३ दशलक्ष) इतकी प्रचंड आहे. इतर विकसनशील आणि अविकसित देशांतही हा वयोगट मोठ्या संख्येनं आहे. विकसित देशांत त्यांची संख्या त्यामानानं कमी असली तरी असंख्य प्रश्न आहेतच. जगात सगळीकडे आता किशोरवयीन मुलांविषयी, त्यांच्या समस्यांविषयी जागृती झालीये. मानवजातीचं भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे, याची जाणीव झालीय. घरात, घराबाहेर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यायला लागतं. त्यांच्या अंगात आणि मेंदूत भरपूर शक्ति असते. पण मेंदू अजून कच्चं मडकं असल्यामुळे सारासार, विवेकी विचार करणं त्यांना अवघड जातं. त्यांची विचार करण्याची पद्धत आवेगी आणि बेपर्वा असते. परिणामांचा विचार करण्याची कुवत नसते, तरीही प्रयोग मात्र करून पहावेसे वाटतात. दोस्तांचा आणि माध्यमांचा प्रचंड प्रभाव असतो. आयुष्य घडवणाऱ्या किंवा बिघडवणाऱ्या अनेक निर्णयांचा काटेरी रस्ता समोर लांबच लांब पसरलेला असतो. शिवाय आपण सगळे जाणतो की आजचं जग कितीतरी अधिक हिंसक, लैंगिक, चिथावणीखोर आणि बटबटीत आहे. त्यावर तंत्रज्ञान आणि माध्यमं यांचा मजबूत पगडा आहे. ही अंतर्गत आणि बाह्य लढाई फक्त पालकांसाठीच नव्हे तर मुलांसाठी सुद्धा अवघड असते.  

विसाव्या शतकाच्या शेवटी-शेवटी किशोरांच्या स्वास्थ्याविषयी जागरूक असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेसारख्या अनेक संघटनांनी यावर काहीतरी करायचं ठरवलं. त्याला कारणीभूत होतं जगभरात किशोरांवर झालेलं संशोधन. त्यांच्यामधला वाढता हिंसाचार, लैंगिक प्रयोग आणि गुंतगुंती, व्यसनं, शैक्षणिक समस्या आणि मानसिक अस्वास्थ्य यांची आकडेवारी भयावह आहे. या सगळ्याला मुलांचाही नाईलाज आहे. त्यांनी नाही तयार केलेली ही परिस्थिति. त्यामुळे फक्त दोषारोप करत बसण्यात अर्थ नाही. अनुभव नसल्यामुळे त्यातल्या कित्येक समस्यांना ते पहिल्यांदाच सामोरे जातात. भविष्यात घडू शकणाऱ्या प्रत्येक समस्येविषयी त्यांना सांगणं, त्यावर तोडगा काढणं कसं शक्य आहे? पालकांचे नुसते सल्ले तर मुलांना नकोच असतात. मग असं काय करता येईल की ज्याचा वापर विभिन्न प्रसंगांत करता येईल? अशी काही मूलभूत कौशल्यं आहेत का, जी मुलांना या आव्हानांविरुद्ध सक्षम करण्यासाठी वापरता येतील? यावर बरंच विचारमंथन झालं. त्यातून या वयातल्या मुलांसाठी आवश्यक अशी दहा जीवनकौशल्यांची यादी तयार झाली. त्यांची नावं अशी-

स्वओळख, सहसंवेदना, समस्या-निवारण, निर्णयक्षमता, सर्जक विचार, सारासार-चिकित्सक विचार, भावनांची योग्य हाताळणी, ताणतणावांचा सामना, परस्पर-नातेसंबंध आणि संवादकौशल्य  

यातली काही कौशल्यं मुलांमध्ये आपपत: असतात. इतर काही सरावानं आत्मसात करता येतात. आपल्याला कल्पना येणार नाही इतक्या वेळा आपण त्यांचा दैनंदिन जीवनात नकळतपणे वापर करत असतो. मगाच्या कोशिंबीरीच्या उदाहरणात आपण त्याची चुणूक पाहिली. जसं एकच कसब अनेक प्रसंगांमद्धे उपयुक्त ठरतं तसंच एका प्रसंगामध्ये अनेक कौशल्यांचा एकत्रित उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ आपलं म्हणणं मित्रांना पटवून द्यायला संवादाचं कसब लागतं, तसंच ते नोकरीसाठी मुलाखत देताना किंवा वाट चुकल्यावर पत्ता विचारतानाही लागतं. परीक्षेची तयारी करताना अनेक जीवनकौशल्यांचा एकत्रित वापर करायला लागतो- आपली कुवत काय, कुठपर्यंत झेप घ्यायची आहे, त्यासाठी कसंकसं नियोजन करायला लागेल, तणावाला काबूत कसं ठेवायचं, अभ्यासाची कुठली तंत्रं वापरायची, पुस्तकातले कुठले भाग गाळता येतील, घरातल्यांचं सहकार्य कसं मिळवायचं आणि जो काही निकाल लागेल त्याला कसं तोंड द्यायचं!

‘नाही’ म्हणायचं संवादकौशल्य घेऊ. कुठे कुठे आवश्यक असतं ते मुलांना? दोस्तांच्या दबावाला बळी पडू नये यासाठी, प्रेमाच्या नकोशा आविष्काराला थोपवण्यासाठी, व्यसनांच्या अधीन होऊ नये म्हणून, असुरक्षित लैंगिक संबंध टाळण्यासाठी,.. यातली बहुतेक आव्हानं किशोरवयीन मुलांना येतात तेव्हा आईबाबा आसपास नसतात. त्यांच्यावर पटकन निर्णय घेण्याचा दबाव असतो. पण दूरगामी विचार करण्याची शक्ति विकसित झालेली नसते आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व स्थापित करण्याची निकड तर भासत असते. नंतर पालकांच्या होणाऱ्या दोषारोपांपेक्षा ताबडतोब मिळणारी दोस्तांची मान्यता वरचढ ठरते. त्या आणीबाणीच्या प्रसंगात या सगळ्या भावनिक कल्लोळाला तोंड देऊन निर्णयापर्यंत पोचणं त्यांच्या अपरिपक्व मेंदूला झेपणं अवघडच असतं. म्हणूनच या अधोरेखित केलेल्या जीवनकौशल्यांनी त्यांना सक्षम करायला हवं.   

टीनएज प्रेग्नन्सी, हिंसाचार, व्यसनं, सामाजिक कौशल्यांचा अभाव, माध्यमांचा अतिरेक आणि बिघडलेलं मन:स्वास्थ्य अशा असंख्य अडचणींशी आजची पिढी झगडतेय. पेपरमध्ये मन सुन्न करणाऱ्या बातम्या वाचल्या की दरवेळी भीतीची आणि रागाची लहर अंगात उठते. पालक म्हणून आपण कुठेकुठे पुरे पडणार, अशी असहाय्यतेची भावना मनात येते. आपल्या मुलांच्या वर्तमान आणि भविष्याविषयी काळजी वाटायला लागते. समाज म्हणून याचा एकत्रित सामना करणं आवश्यक आहेच, आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे. पण बाह्य जगाला बाधित केलेल्या या विषावर वैयक्तिक पातळीवर जीवनकौशल्यं शिकवून उतारा शोधता येईल का? सुदैवानं आत्तापर्यंत झालेलं संशोधन याला दुजोरा देतंय.

आणि हो, किशोरवयीन मुलांच्या पालकांना स्वत:साठी यांचा उपयोग आहेच की! आयुष्याच्या मध्यावर पोचल्यावर त्यांनाही काही कमी आव्हानं नसतात. भावनिक उद्रेकांपासून स्वत:ला वाचवायची त्यांनाही गरज असते. नात्यांच्या गुंता सोडवायचा असतो. आर्थिक, शारीरिक अडचणींना तोंड द्यायचं असतं. एक बरंय की आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर जीवनकौशल्यं शिकता येतात. ती कशी शिकायची आणि शिकवायची हा एक खूप मोठा आणि स्वतंत्र विषय आहे. त्याविषयी पुनः केव्हातरी.   

 

Wednesday, 30 April 2025

आभासी स्पर्श

 (Previously published in Lokmat)

आभासी स्पर्श

डॉ वैशाली देशमुख

नुकत्याच दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या एक निकालात आभासी स्पर्श (virtual touch) या संकल्पनेचा उल्लेख आला. अल्पवयीन व्यक्तीवर केल्या गेलेल्या अत्याचाराच्या संदर्भात हा निकाल होता. आरोपीची आणि पीडित व्यक्तीची ओळख ऑनलाइन झाली होती. पालक मुलांना जशी चांगल्या-वाईट स्पर्शाची ओळख करून देतात, तशीच त्यांनी अशा विकृत आभासी स्पर्शाचीही ओळख करून दिली पाहिजे, म्हणजे असे प्रसंग कमी घडतील असं या निकालात म्हटलं होतं.

त्यावर एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेला लेख वाचला. ‘प्राप्तेषु षोडशे वर्षे’ अशा किशोरवयात मुलं स्वत:ची ओळख, स्वत:चं स्थान शोधत असतात. त्यांच्या अंगात रग असते, धोके घेण्याची प्रवृत्ती असते, नवनवीन प्रयोग करून बघण्याची आस असते. त्यांच्या विकासाच्या टप्प्याचा हा एक नैसर्गिक भाग आहे. शिवाय कृतीवर त्यांचा ताबा नसला तरी मुलांना या धोक्यांची जाणीव नसते असं नाही, उलट आभासी जगाच्या संदर्भात त्यांना पालकांपेक्षा काकणभर जास्तच माहिती असते. त्यामुळे इथे प्रशिक्षक म्हणून पालक कमी पडू शकतील असं त्यांना वाटतं.

शिवाय याबाबत कायदे करायचे तर हे वय इतकं परिवर्तनशील असतं, प्रत्येक मुलात इतकं वैविध्य असतं की सर्वांना लागू होतील अशा वयाच्या ठोक मर्यादा तयार करणं फार अवघड आहे. मग करायचं काय? मुलांना या प्रत्यक्ष आणि आभासी जगातल्या धोक्यांपासून बचावायचं कसं? पालकांनी या सगळ्याकडे नुसतं हताशपणे बघत बसायचं का? याविषयी काही मुद्दे पाहूया.

मला वाटतं यात पालक-मुलांपैकी कुणाचं ज्ञान किती, कोण कशात जास्त हुशार हे बाजूला ठेवू. अगदी लहानपणी पालक मुलांपेक्षा सर्वच बाबतीत ज्ञानानं, अनुभवानं, विचारांनी वरचढ असतात. नंतर हळूहळू मुलांचं स्वत:चं व्यक्तीमत्त्व विकसित होत जातं. ते आपापली स्वतंत्र विचारसरणी, मूल्यसंस्था बनवतात. बहुतेक वेळा पालक स्वत:ला मिळालेल्या संधींपेक्षा अधिक संधी मुलांना मिळतील हे बघतात, त्यामुळे साहजिकच मुलांचं सामान्यज्ञान आणि प्रत्यक्षदर्शी अनुभव पालकांपेक्षा अधिक असणं साहजिक आहे. किशोरवयाची वैशिष्ट्यं बघता मुलं धोके घेणार, मर्यादा धुडकावून देऊन नवनवीन प्रयोग करणार हे गृहीत आहे. त्यांच्या स्व-ओळखीच्या शोधाच्या प्रवासाची ती गरजही आहे. प्रौढांना जो प्रत्यक्ष किंवा आभासी स्पर्श वाईट वाटतो तो त्यांना शृंगारिक, हवाहवासाही वाटू शकेल. पण त्याचबरोबर त्यांच्या मेंदूच्या विकासाच्या मर्यादा पाहता निर्णय घेण्यात, कृतींचे परिणाम समजण्यात त्यांना अडचणी येणार हेही सत्य आहे. याउलट प्रत्यक्ष तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली तांत्रिक माहिती कमी असली तरी सारासार विचार, परिणामांची रास्त जाणीव आणि मुलांचं भलं व्हावं अशी तीव्र आंतरिक इच्छा ही पालकांची ताकद आहे. आभासी जगाचं सामर्थ्य खूप आहे. त्यावर ताबा मिळवणं सोपं नाही हे लक्षात आलंय. पण भस्मासुर निर्माण झाला तेव्हाही असंच वाटलं होतं. इतकं पौराणिक उदाहरण कशाला, तीन-चार वर्षांपूर्वी आलेल्या, अशक्य वाटलेल्या कोव्हिडच्या त्सुनामीतूनही जग सावरलं, हळूहळू स्थिरस्थावर झालं. आभासी जगाच्या आपरिहार्यतेचा आपल्याला स्वीकार करावा लागणार आहे, त्याचबरोबर त्याला ताब्यात जरी ठेवता आलं नाही तरी निदान अनिर्बंध राज्य तरी करू देता येणार नाही असं बघायला हवं.

पण स्वत: परिपूर्ण ज्ञान मिळवल्यानंतरच पालक मुलांना विवेकी वर्तन शिकवू शकतील असं ठरवलं तर ते फार अवास्तव होईल. आयुष्य इतकं अनपेक्षितपणे उलगडतं की पुढे येणाऱ्या प्रत्येक घटिताबद्दल पालकांना, मुलांना यथोचित माहिती असणं अशक्य आहे. आभासी धोक्यांबद्दलही तेच खरं आहे. त्याविषयी अगदी संपूर्ण माहिती ना पालकांना असते ना मुलांना. त्यामुळे ‘हे असं झालं तर असं वाग, तसं झालं तर याचा उपयोग होईल’ अशी ठाम मार्गदर्शक तत्त्वं घालून देता येणार नाहीच आहेत. पण शेवटी मिळालेल्या कोणत्याही ज्ञानाला सुरक्षितपणे हाताळायचं कसं याचे सर्वसाधारण नियम असतातच की! कुठलीही समस्या आली, द्विधा अवस्था झाली तर कसा विचार करायचा; स्वत:ला कसा वेळ द्यायचा; त्यातल्या त्यात योग्य निर्णय कसा घ्यायचा; आणि तरीही समस्या आलीच तर त्यातून बाहेर कसं पडायचं हे तरी निश्चित सांगता येईल. दिवसभरात घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगातून या पद्धतींचं प्रात्यक्षिक देता येईल. हीच कौशल्यं मुलांना नाती बनवायला, वाढवायला आणि जपायला शिकवतात; ताणतणावांना आणि आपत्तींना तोंड द्यायला तयार करतात. माध्यमं हाताळताना वापरायचा सारासार विवेक शिकवतात. मित्रांच्या दबावाला तोंड द्यायला सक्षम करतात. आपण स्वतंत्र असलो तरी एकटे नाही आहोत, समाजाचा एक भाग आहोत, त्याप्रती माझी काही कर्तव्यं आहेत याची जाणीव करून देतात. भविष्यातल्या अनोळखी, अगम्य आयुष्यात वाटचाल करताना अदृश्य दिशादर्शकाचं काम करतात.

एकूण विचार करता असं ध्यानात येतं की न्यायालयानं उल्लेख केलेली ही आभासी स्पर्शाची संकल्पना खूप महत्त्वाची आहे. पण आभासी स्पर्श म्हणजे नक्की काय याची व्याख्या कशी करायची? जी आभासी वर्तणूक आपल्या आयुष्याला, लैंगिकतेला नकारात्मकरित्या स्पर्श करते, उद्दीपीत करते त्या गोष्टींचा यात समावेश करता येईल का? काही उदाहरणं सांगायची झाली तर – अश्लील व्हिडिओजची, फोटोंची किंवा मेसेजेसची देवाणघेवाण, अनोळखी व्यक्तींशी व्यक्तिगत माहिती शेअर करणे, तुटपुंज्या माहितीच्या आधारे अशा व्यक्तींना प्रत्यक्ष भेटायला जाणे, शहानिशा न करता फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास ठेवून त्यांना पासवर्ड सांगणे, .. ही यादी अर्थातच न संपणारी आणि सतत बदलत राहणारी आहे, त्यामुळे ती कधीच फायनल किंवा परिपूर्ण नसणार. पण साधारणपणे अशा प्रकारची परिस्थिति आली किंवा त्याबद्दल नकोशी भावना मनात आली तर निदान निर्णय घेण्याआधी थोडा वेळ द्यावा, जपून पावलं टाकावीत, ती तीव्र उर्मी काही वेळासाठी तरी ताब्यात ठेवावी, आणि जरूर पडल्यास मदत घ्यावी याविषयीचं प्रशिक्षण पालकांना मुलांना देता येईल. फक्त ‘आम्हाला सगळं समजतं’ अशा आवेशात नको, तशी ती ऐकणार नाहीत, किशोरवयात तर नाहीच. कदाचित गटांमध्ये ते प्रात्यक्षिकासाहित, मुलांना सहभागी करून घेत जास्त उपयुक्तपणे पोचवता येईल. तिथे दुतर्फा चर्चा होईल, मुलांना त्यांची मतं व्यक्त करण्याची संधीही मिळेल, ज्यामुळे आपल्याला वर्तणुकीतल्या बदलांची जी अपेक्षा आहे तीही पुरी होण्याची शक्यता वाढेल. कारण वाढत्या वयाच्या मुलांना त्यांच्याविषयी निर्णय घेताना त्या प्रक्रियेत सामील करून घेतलं जाण्याची अपेक्षा असते, तरच नियम आणि कायदे पाळले जातात. किशोरवयात असणाऱ्या दोस्तांच्या प्रभावाचा विचार करता यात मित्र-प्रशिक्षक (peer educators) या संकल्पनेचा वापर उपयुक्त ठरेल, म्हणजे काही किशोरवयीन मुलांना याबाबत प्रशिक्षित करून इतरांना त्यांनी त्याबद्दल माहिती सांगायची, मदत करायची.

आभासी स्पर्शाच्या या संकल्पनेवर अजून प्रवाही विचार करत राहू या, कदाचित अजून खूप काही गवसेल यातून.


Friday, 19 July 2024

English book on Teenage parenting 'Help! Teenager at Home'


Available on www.rajhansprakashan.com, Amazon 



 

Teenage parenting session @ Bhavartha






 Had an amazing,  interactive session on teenage parenting at Bhavartha Books on 18th July 2024

To watch, click on

https://thesocialreform-my.sharepoint.com/:v:/g/personal/prerana_thesocialreforms_org/EZLUFrPx5fNJnmF95dT8WcIBkZncGwCgscpuPDB3P_8q0Q?e=PhJo2J


Sunday, 29 October 2023

One dish meal: Thalipeeth


 A high protein, versatile, filling snack which can be a one dish meal in itself, thalipeeth is a unique staple of Maharashtra.

The flour can be home made using a mixture of roasted cereals and pulses. It is also available ready-made. 

A variety of different veggies can be added to make it more flavourful and nutritious. 

Monday, 5 September 2022

Things Happen for a Reason!! - Why is adolescent behavior so weird?

 

 

    When it comes to adolescents, what is it that puts you off? Their rough voices? Their brash language? The irritating attitude? Or the weird fashion sense? Well, what if all this is part of a larger plan? Reminds me of a story- ‘Everything happens for a reason!’

A king had great faith in his lieutenant. But he would get irritated with him because every time some mishap occurred, the lieutenant kept saying, ‘Everything happens for a reason!’ Once, the king cut his finger accidentally and the lieutenant parroted his oft repeated sentiment. Now the king, who was in great pain, was really angry. In fact, he got so angry that he put him in prison. The next day, the king went for a hunt alone. Unfortunately, he was caught by some tribals. When they took him for sacrifice, they found that his finger was cut and they couldn’t offer an imperfect human to their god. After discussing amongst themselves, the tribals reluctantly released him. Happily, the king returned home. He freed the lieutenant from the prison and admitted his mistake. The cut finger had indeed saved the king’s life. Not only that, since the lieutenant was in prison, he too was saved.

    The lieutenant’s words apply to the adolescents’ behaviour too! All the dangerous characteristics typically associated with adolescents have an evolutionary function. We always wish that they should be more organised, less aggressive, less curious, and more obedient. We don’t want them to take risks, or to follow their peers blindly. But the adolescents do exactly that. To be fair, they can’t really help it! They find themselves powerless in the face of their changing brain, which is undergoing a major update. There are extensive neurobiological changes such as pruning, myelination, and fine tuning of circuits. The limbic system is in an overdrive, the hormones are raging, and the sensible frontal and prefrontal cortex are still lagging behind; leading to imbalance between affect and cognition. Their thinking is still concrete, more so during stress and when faced with peer pressure. Their reward centre in Nucleus Accumbens is screaming for attention. As a result, they tend to take decisions which are based on emotions rather than rational thoughts. They quickly fall prey to activities that flood the reward centre with Dopamine. These activities range from simple acts like doing well in exams or a pat on the back from the father; to dangerous acts like crime, speed driving, violence, substance abuse and sexual misadventures.

     So, the unwanted, unacceptable adolescent behaviour can be explained by this changing brain. But what is the evolutionary importance? The aim of growing up is to make responsible and socially independent individuals. The major developmental task of adolescence is ‘identity formation’. For this, they need to explore the opportunities, which cannot happen unless they take some risks. Their curiosity and experimentation lead them to discoveries and inventions. By not listening to their parents, they walk the path of independence and self-sufficiency. In fact, it is said that the reason the humankind is living in the modern comforts and not foraging for food in the jungles is because the children of every generation ignored their parents’ advice. Distancing from parents also provides them with a space to develop as an individual. Lastly, conforming with the peers is an essential step in socialization.

    Researchers have cautioned against helicopter parenting and snow-plough parenting, where parents unduly protect their children against all challenges. This is likely to interfere with the natural process, and might result in our children having poor resilience to face the adversities. Our children might be unable to take correct decisions, may find it difficult to resist temptations like substance abuse, and will be victims of mental health issues. Adolescents need to be handled like a kite- give them enough freedom to explore the world while keeping them safe and grounded by the thread. Some of the helpful steps that we can take as their stakeholders are- anticipatory guidance; supervised, cautious and gradual risk taking; channelising their tremendous energy and creativity; plenty of sports and adventure activities, and of course, tons of patience and empathy!

Thursday, 3 September 2020

Stir-fry vegetables

 Ingredients:

1. Fresh vegetables - capsicum, cauliflower, broccoli, carrot, babycorn, mashroom (optional)

2. Ginger-garlic paste

3. Hot and sweet sauce 

4. Butter

5. Salt and pepper flakes to taste

Cut the vegetables into bite size pieces. Heat half the butter in a wok/pan. Add ginger-garlic paste. Sauté until brown. Add the diced vegetables. Sauté on high flame. Add salt, pepper. Now add the sauce. Add remaining butter and stir for one to two minutes. Serve hot. Can be savoured as it is or with a toasted bread or boiled rice.

Variations: You may season it with some herbs. Or garnish it with grated cheese. Nonveg lovers can add pieces of roasted chicken or mutton.

Wednesday, 22 January 2020

ताणतणावांच्या पलीकडे

( published in Loksatta Viva Dec 2017)

युवा मित्र-मैत्रिणींनो,
गेले वर्षभर आपण तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या चॅलेंजेसविषयी गप्पा मारल्या. कॉलमचा विषयच होता ताणतणाव! आणि ताणतणाव म्हटलं की त्यात बरंच काही येतं. कारण ताणाची कारणं आणि परिणाम दोन्हीही असंख्य आहेत. आपल्या रोजच्या जीवनातली जवळजवळ प्रत्येक गोष्ट आपल्याला ताण देऊ शकते. अगदी सकाळी उठण्यापासून ते रात्री शांत झोप लागेपर्यंत. त्यामुळे मैत्री, प्रेम, व्यसनं, नोकरी, भावना, नाती इथपासून ते ट्रॅफिक, लैंगिकता, सोशल मीडिया, लग्न असे अनेक विषय यात आपोआपच आले.

तुमची सगळी पिढी एका मोठय़ा बदलाच्या लाटेतून जातेय. हा बदल महाकाय आहे आणि फार वेगवानही आहे. इतका वेगवान की तो आपल्याला विचार करण्याएवढाही अवधी देत नाही. त्यावर काही स्ट्रॅटेजी प्लॅन करायला उसंत देत नाही. किंबहुना ही सगळी विचार वगैरे करण्याची गरजच मुळी तुम्हाला वाटत नाही. जे काही पुढय़ात येईल त्याला तोंड द्यायची तुमची तयारी आहे. त्या वेगाची झिंग चढल्यासारखी झालीये. अर्थातच, त्यामुळे त्याच्या परिणामांकडे लक्ष द्यायला सवड नाहीये. पण म्हणून ते परिणाम व्हायचे राहतात थोडेच! या आपल्या लाइफस्टाइलचा आणि तणावांचा थेट संबंध मात्र जोडता येत नाही. सतत अस्वस्थ व्हायला होतं. कसलीतरी हुरहुर जाणवत राहाते. कितीही मिळालं, कितीही मजा केली तरी आणखी काहीतरी हवं असं वाटत राहातं. भरपूर मित्रमैत्रिणी असूनही एकटं वाटतं. एकाकीपणातून येतं नैराश्य आणि त्यातून घडतात आत्महत्या.

तुमच्यात असलेली ती सळसळती ऊर्जा, ते कुतूहल, ती ताकद, तो उत्साह यांचा तुम्हाला तरी अंदाज असतो की नाही कोण जाणे. खरंतर त्यातून खूप काही घडू शकतं. नुसत्या तुमच्या स्वत:च्या आयुष्यातच नव्हे तर सगळ्या समाजात, देशात, जगात! आपल्याला खूप काही करता येईल, आपल्या कोशातून बाहेर येऊन आपल्या ऊर्जेचा इतरांसाठी वापर करता येईल. पण ठेवतो का आपण हा काहीसा विशाल दृष्टिकोन?
रामदास स्वामींची ही गोष्ट तुम्ही ऐकली आहे की नाही माहिती नाही. सांगू?
ते लहान असताना एकदा आईला सापडेचनात. ती त्यांना घरभर शोधून थकली, शेजारीपाजारी पाहिलं. शेवटी छोटा रामदास कुठे सापडला माहितेय? एका भिंतीतल्या कपाटात, फडताळात! आईने विचारलं, ‘अरे, इथे काय करतोयस?’ त्यांनी उत्तर दिलं, ‘चिंता करतो विश्वाची!’ इतक्या लहानपणी ही विश्वाची, साऱ्या जगाची चिंता त्यांना सतावत होती. जगाच्या कल्याणासाठी काय करता येईल यासाठी ते विचार करत होते. फक्त मी, माझं या चक्रात अडकलेले नव्हते.

हा असा इतरांचा विचार करणं हीच असेल का तणावांवर मात करणारी जादूची छडी? आपण करतो का असा विचार? तुम्हाला काय वाटतं, बघता येईल स्वत: पलीकडे जाऊन? आपल्या चिंता सतत भिंगातून बघून आपल्याला इतक्या मोठय़ा वाटायला लागतात की त्याशिवाय दुसरं काही दिसेनासं होतं. ते भिंग बाजूला करून पहायचं का? तसं करता आलं तर आपले कितीतरी ताण या जादूसारखे नष्ट होतील. विरघळून जातील. ते किती किरकोळ आहेत हे लक्षात येईल. मग कदाचित आपण त्यांना अवास्तव महत्त्व न देता त्यांची योग्य जागा त्यांना देऊ शकू.

आपल्या आयुष्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलं तर दिसतं की कितीतरी न पटणाऱ्या गोष्टी आपण उगीचच करत असतो. पण काय करावं हे सुचत तरी नसतं किंवा तसा विचारच केलेला नसतो. म्हणून नाइलाजानं आपण मळलेल्या वाटा चोखाळत राहतो. सगळे करतायेत म्हणून या अशा आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायचा असफल प्रयत्न करत राहायचं की आनंदाचे आपापले मार्ग शोधायचे? इतरांबरोबर फरफटत जायचं की आपल्या विचारांशी जुळणारे दोस्त निवडायचे? सतत अस्वस्थ राहायचं की समाधानाचं गुपित शोधायचं? कोणीतरी कधीतरी काहीतरी वेगळा विचार केला म्हणूनच नवनवीन गोष्टींचा शोध लागला. मग आपणच का होऊ  नये तो वेगळा विचार करणारे? शिकायचं का जगाकडे, स्वत:च्या आयुष्याकडे जरा वेगळ्या नजरेनं पाहायला?

आपला पुढचा लेख या मालिकेतला शेवटचा लेख असणारेय. आणि खरंतर तो तुम्ही लिहावा असं मला वाटतंय. कारण आपल्या ताणासाठी आपण काय करू शकतो, हे तुम्हीच शोधून काढू शकाल. त्यासाठी मदत नक्की मिळेल चारी दिशांनी. तुमचे दोस्त, आई-बाबा, भावंडं, शिक्षक, माझ्यासारखे डॉक्टर्स, पुस्तकं आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, ‘गूगल’! पण या सगळ्या सल्ल्याचा फारतर दिशादर्शक म्हणून उपयोग होईल. उत्तरं स्व:हून शोधून काढली तरच ती वापरतो आपण.
मग सांगाल का या ताणतणावांवरचे तुमचे खास उपाय?

Sunday, 12 January 2020

गेमिंगचा विळखा (डॉ. वैशाली देशमुख) - https://www.esakal.com/saptarang/saptarang-pubg-game-and-mobile-game-article-write-dr-vaishali-deshmukh-217432

Saturday, 11 January 2020

थँक यू!



उन्हाळ्यातली एक प्रसन्न सकाळ. जय उत्साहात जागा झाला. त्याला आठवलं, आज दहा मे, त्याचा तेरावा वाढदिवस! आता तो टीनएजर होणार. खूप बेत आखले होते त्यानं  या दिवसासाठी. तोंड बिंड धुवून तो ब्रेकफास्ट ला आला. ताज्या केकचा मस्त वास सुटला होता. आई सकाळ पासून कामाला लागलेली दिसतेय. तेव्हढयात नेहा, त्याची धाकटी बहिण, जिन्यावरुन दडदडत आली आणि त्याच्या पाठीत धबका मारत म्हणाली, 'happy birthday, दादा! हं, हे घे. मी तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलंय.' त्याच्या हातात एक रंगीत कार्ड देत नेहा म्हणाली. ‘हे बघ नेहा, आज माझे सगळे मित्र-मैत्रिणी येतायत. तू अजिबात मध्ये मध्ये करायचं नाहीस, कळलं?’ नेहा बघतच राहिली. थँक यू वगैरे म्हणायचं सोडून हे काय?

दिवसभर जयची नुसती चंगळ होती. आजी-आजोबा त्याच्यासाठी खास मिठाई घेऊन आले. काकांनी शर्ट आणला. आणि आई-बाबांनी चक्क गिअरची सायकल! कितीतरी दिवसांपासून त्याला गिअरची सायकल हवी होती. संध्याकाळी सगळ्या मित्र-मैत्रिणींनी मिळून धमाल केली. जयचा आवडता पिझ्झा मागवला आणि केक कापला.

तरीही रात्री झोपताना जय तसा अस्वस्थच होता. कसलीतरी रुखरुख लागली होती त्याला. कसली, ते मात्र कळत नव्हतं. खरंतर संध्याकाळी पार्टी जोरात झाली होती. पण जयचा सगळ्यात जिगरी दोस्त मात्र काही कारणानं आला नव्हता. ‘एवढं काय महत्त्वाचं काम निघालं असेल? आणि गिफ्ट्सचं म्हणाल तर काही फार खास नव्हत्या त्या. काकांनी आणलेला शर्ट पिवळ्या रंगाचा होता! पिवळ्या रंगाचा शर्ट कुणी घालतं का? आणि आजीआजोबांना माहिती नाही का त्याला मिठाई आवडत नाही ते? बरं, ती सायकल तरी मनासारखी मिळाली असती तर बरं झालं असत. तर तेही नाही. वर आई-बाबांच्या सारख्या सूचना चालूच. अरे, मी टीनएजर झालोय आता, कुक्कुलं बाळ नाहीये. किती कटकट कराल?’ जयच्या मनात विचारांच्या लाटांवर लाटा फुटत होत्या. काहीशी उशीराच झोप लागली त्याला.

सकाळी सकाळी जयला जाग आली ती सन्मयच्या हाकांनी. ‘जय, अरे येतोयस ना? का विसरलास आपल्या ट्रेकचं? चल लवकर.’ नित्या, बेला आणि रेहानही  आले होते. ‘आणि सॉरी रे, काल येता नाही आलं. मला पण इतकं वाईट वाटत होतं ना!’ सन्मय जयला म्हणाला. तेवढ्यात जयची आई म्हणाली, ‘जयचा ब्रेकफास्ट व्हायचाय अजून. तुम्ही पण खाऊन घ्या थोडं थोडं. मी खिचडी केलीय मस्त.’ काकूंची खिचडी फेमस होती एकदम. त्यामुळे कुणी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. आणि नाहीतरी इथे कुणाला घाई होती? वेळच वेळ होता त्यांच्याकडे.

भरपेट खिचडी खाऊन ते जेव्हा टेकडीवर पोचले तेव्हा सूर्य चांगलाच वर आला होता. क्रिकेट खेळणारी सात-आठ मुलं सोडली तर तसा शुकशुकाटच होता. लांबून येणारे गाड्यांचे आणि हॉर्नचे आवाज मधूनच ती शांतता चिरत होते. एका प्रशस्त पारावर त्यांनी अड्डा टाकला. मस्त गार वारा सुटला होता. त्या क्रिकेट खेळणा-या मुलांकडे जय निरुद्देशपणे बघत बसला. एक तुटकी बॅट आणि जुनाट बॉल घेऊन त्यांचा खेळ चालला होता. एक मुलगा तर अनवाणी पायांनी खेळत होता. पण धम्माल चालली होती त्यांची. आरडा-ओरडा करत, टाळ्या वाजवत ते खेळाची पुरेपूर मजा लुटत होते. एकदा तर एका मुलानं असा काही कॅच घेतला की बस! आता मात्र जयला रहावलं नाही. ‘आम्ही पण येऊ का रे खेळायला?’ त्यानं विचारलं. ‘या की, आपण मोठ्या टीम्स करू.’

त्यांचा खेळ थांबला तेव्हा दुपार झाली होती. सगळे घामानं भिजून चिंब झाले होते. त्यांचे चेहरे उन्हानं आणि खेळण्याच्या श्रमानं लालेलाल झाले होते. घामेजलेल्या केसांतून गार वा-याची झुळूक गेली की गुदगुल्या होत होत्या. पुन्हा भेटण्याचं ठरवून ते निघाले. परत येताना जयच्या चेह-यावर हसू होतं. त्याला खूप छान मोकळं मोकळं वाटत होतं. त्यानं मान वर करून पाहिलं. आकाश एकदम स्वच्छ निळं दिसत होतं. टेकडीवरची गर्द झाडी डोळ्यांना थंडावा देत होती. दुरून कोकिळेची कुहू कुहू ऐकू आली. बरोबर हसत खेळत, गप्पा मारत चाललेल्या दोस्तांकडे पाहून त्याची कालची अस्वस्थता कुठच्या कुठे पळून गेली. घरी पोचेपर्यंत तो मस्त मूडमध्ये आला होता.

आल्या आल्या अंगणात उभी असलेली नवी सायकल दिसली. ‘त्यावर चक्कर मारायला काय मजा येईल!’ त्याला वाटलं. हॉलमध्ये बसलेल्या बाबांनी त्याला विचारलं, ‘काय रे, सायकलचं मॉडेल आवडलं नाही का तुला? फारसा खूष दिसला नाहीस काल. मी दुकानदाराला सांगून ठेवलंय, तो बदलून देईन म्हणालाय.’ जय गडबडून म्हणाला, ‘अं, नाही, तसं काही नाही. चांगली आहे की सायकल. मी चालवून बघतो एकदा, मग बघू.’

रात्री जेवताना नेहा जरा गप्प गप्पच होती. तिला जरा बरं वाटावं म्हणून जय म्हणाला, ‘नेहा, काय मस्त ग्रीटिंग कार्ड केलंस गं. अगं पुढच्या आठवड्यात बेलाचा वाढदिवस आहे. तिच्यासाठी मला करून देशील का एक कार्ड? तुला माहितेय माझी दिव्य चित्रकला!’ नेहा खुदकन हसली आणि कार्ड बनवायला आनंदानं तयार झाली.

त्या रात्री झोपायला गेल्यावर जयच्या डोक्यात आजच्या सबंध दिवसाचं चित्र उभं राहिलं. ती टेकडी, त्यावर खेळलेली ती एक्सायटिंग मॅच, ते नवीन मिळालेले मित्र, तो गार वारा; सगळं त्याला लख्ख आठवलं. ती मुलं किती वेगळी होती खरंतर! पण मजा मात्र तितकीच जबरदस्त आली. एखाद्या मोडक्या बॅटनं खेळायला इतकी धमाल येते याची त्यानं कधी कल्पनाही केली नव्हती. कालच्यासारखीच आजही त्याला झोप येत नव्हती पण त्याचं कारण मात्र वेगळं होतं. आज तो विचार करत होता कालच्या रुखरुखीबद्दल. ‘तसं काही कारण नव्हतं आपल्याला नाराज व्हायला. घरच्यांनी प्रेमानं दिलेल्या भेटींना आपण उगीचच नाकं मुरडली. आणि नेहाशीसुद्धा किती उद्धटपणे बोललो!’ त्याला त्याचं प्रेमळ कुटुंब आठवलं, प्रशस्त शाळा आठवली. जिवाभावाचा मित्र आठवला. मिळालेल्या भेटवस्तूंचा ढीग डोळ्यासमोर आला. ‘खरच, किती नशीबवान आहोत आपण!’ आज तो या सगळ्याकडे एका निराळ्याच स्वच्छ दृष्टीनं बघत होता. कसं काय शक्य झालं हे? हं, नक्कीच त्या टेकडीवरच्या मुलांनी काहीतरी जादू केली असणार. त्यांचा उत्साह बघून तर त्याला कळलं की छोट्या छोट्या गोष्टीतही कसा आनंद घेता येतो! त्यानं एक लांबलचक सुस्कारा सोडला आणि मनापासून म्हटलं, ‘थँक यू!’ आता जयचं मन आनंदानं आणि कृतज्ञतेनं काठोकाठ भरलं होतं. कधी अलगद झोप लागली ते त्याला कळलंही नाही.

THINK before you post!


A chat on WhatsApp can land you in jail! Do be careful about what you post! Use THINK formula before sending any electronic message (source- http://goo.gl/Ou46Uh ). Ask yourself a few questions before hitting the 'send' button.

T- Is it true?
H- Is it hurtful?
I- Is it illegal?
N- Is it necessary?
K- Is it kind?

एका रेल्वेप्रवासाची चित्तरकथा



स्थळ- रेल्वेस्टेशन, रेल्वे
पात्रे- तिकीट चेकर, किशोरवयीन मुले-मुली, सहप्रवासी

( सुहास आणि त्याची दोस्तमंडळी सुट्टीमध्ये एका छोट्या ट्रीपला चालली आहेत.)

सुहास- ( रेल्वेस्टेशनमधल्या गर्दीतून वाट काढत ) अरे, पटापट चला जरा. अजून आपल्याला कुठल्या प्लॅटफॉर्मवर गाडी लागणार आहे तेपण शोधायचंय.

विशू- हो ना, तरी मी सांगत होतो अर्धा तास आधी पोचायला हवं म्हणून. ही अस्मी नेहमी उशीर करते.

अस्मी- बरं बाबा, तुझंच बरोबर! आता चालणार आहेस की असाच कीस पाडत बसणार आहेस?

हमाल- ओ ताई, द्या हिकडं ती ब्याग. कुटली गाडी हाय?  म्या देतो बसवून.

सुहास- नको दादा, आम्ही जाऊ. थँक यू.

(एकदाचे प्लॅटफॉर्मवर पोचून डब्यात शिरतात.)

जितू- अरे काय हे सुहास, एक जागा इकडे आणि बाकी सगळ्या तिकडे? तू नीट बघितलं नाहीस का बुकिंग करताना?

अनू- असू दे रे. सगळे आले ना, की करू आपण अॅड्जस्ट.

विशू- (किंचाळून) ईsss इथे झुरळ आहे! मी नाही बसणार इथे.

( सगळे हसतात)

काका (सहप्रवासी)- घाबरू नकोस बाळ, ये, तू इकडे बस.

( विशू एकटाच इतरांपासून वेगळा बसतो. थोड्या वेळाने... )

विशू- आsss वाचवा, वाचवा!

अनू- काय चाललंय काय आज विशू तुझं? किंचाळतोयस का सारखा?

विशू- अगं, हे काका बेशुद्ध पडलेत बहुतेक.

अनु- काहीतरी काय? ते गाढ झोपलेयत आणि घोरतायत. (त्यांना हलवून) हे बघ, जागे झाले. सॉरी काका. काही नाही, झोपा तुम्ही.  चल विशू, तू इकडे ये बघू. आम्ही पत्ते खेळतोय.

(सगळेजण पत्ते खेळण्यात गुंग होतात. बरोबर आणलेल्या खाऊची देवाण-घेवाण होते. बराच वेळ जातो, काही स्टेशन्स येऊन जातात. तिकीट चेकर येतो)

सुहास- हं, ही आमची तिकीटं.

तिकीट चेकर- तुमचं स्टेशन गेलं की मागे. उतरला नाहीत का तुम्ही? चला, आता येणा-या स्टेशन वर उतरून घ्या.

जितू- क- क्काय? उतरून घ्या म्हणजे? सांगितलं का नाही कुणी आम्हांला? इथे उतरून काय करू आम्ही? ए, आपण चेन खेचायची का?

सुहास- जितू एक मिनिट. काका, ही गाडी परत येते का या मार्गानं? जायचं कसं मागच्या गावात आम्ही?

तिकीट चेकर- हे बघा, मला ते काही माहिती नाही. हे आलं स्टेशन. पटकन उतरून घ्या. नाहीतर दंड भरायला लागेल विना तिकीट प्रवास केला म्हणून.

(सगळेजण त्या सुनसान स्टेशनवर गोंधळून उभे)

अस्मी- बाप रे, काय करायचं आता? मला फार भीती वाटतेय. कसली भयानक जागा आहे ही! बसा आता इथेच डोक्याला हात लावून. मी काही कुठल्या अनोळखी लोकांशी बोलणार नाही बुवा. शी:, सगळी ट्रीप वाया गेली.

मीता- ए अस्मी, अगं उलट खूप मज्जा येईल. मला तर आपण त्या फेमस फाईव्ह सारखं काहीतरी धाडस करतोय असं वाटायला लागलंय.

चिनू- जे काही असेल ते असेल, पण आपल्याला काहीतरी करायला हवं आता. कुणालातरी विचारायचं का? पण इथे तर काळं कुत्रं पण दिसत नाहीये. काय स्टेशन मास्तर वगैरे नाहीयेत का इथं? ए अरे सुहास, बघ ना काहीतरी.

विशू- हो रे सुहास. एकतर ही सगळी आयडिया तुझी होती. आणि तुम्हांला माहितेय का, आपल्याला फोनही करता येणार नाहीये कुणाला. सुहास साहेबांनी फोन न आणण्याचं फर्मान काढलं होतं ना, त्यामुळे आपण कुणीच आणले नाहीयेत.

सुहास- सॉरी विशू, अरे मला वाटलं आपली ट्रीप गॅजेट-फ्री असावी. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी आहे, आपण एका रेल्वे स्टेशन वर आहोत, कुठेतरी वाळवंटात नाही. सापडेल काहीतरी मार्ग.

अनु- सुहास, थँक्स. कुणीतरी जरा बरा विचार करतोय हे बघून मला बरं वाटलं. चला, त्या स्टेशन मास्टरना शोधूया आणि परतीच्या ट्रेनची चौकशी करूया. इथे थांबून काय करणार? किंवा आपल्याला एखादी एस टी बस वगैरे मिळू शकेल. नाहीतर लिफ्ट मागू कुणाकडे तरी.

चिनू- लिफ्ट? तसलं काहीतरी करायचं असेल तर जरा नीट बघून घ्यायला हवी हं. माझा मावसभाऊ असाच एकदा कुणाच्यातरी गाडीत बसला तर त्या लोकांनी त्याला सरळ लुटलं!

जितू- हं, आणि परत जायला हरकत नाही पण मग आपली पिकनिक राहून जाईल. त्यापेक्षा असं करायचं का? इथेच करू पिकनिक. आपल्याकडे भरपूर खाऊ आहे. मस्तपैकी शेतात हिंडू आणि मजा करू.

मीता- हेच म्हणायचं होतं मला. ती बघ, तिकडे एक आमराई दिसतेय. मस्त गार सावली आहे. त्या मालकांना शोधूया. त्यांची परवानगी पण घेता येईल आणि ते आपल्याला काही मदतही करतील.

सुहास- अरे वा, भरपूर आयडियाज जमा झाल्या की! मजा येईल आमराईत पिकनिक करायला. फक्त त्याआधी परतीच्या ट्रेनची चौकशी करून ठेवू. अंधार पडायच्या आत घरी पोचायला हवं ना! स्टेशन मास्टर आलेले दिसतायत, मी बोलून येतो त्यांच्याशी. तोपर्यंत तुम्ही जरा बघाल का आपल्यापाशी पैसे किती आहेत ते?

(सुहास स्टेशन मास्टर शी बोलून परत येतो)

गुड न्यूज! चार वाजता एक ट्रेन आहे. म्हणजे आपल्याला मनसोक्त हिंडून साडेतीन पर्यंत परत आलं तरी चालेल. नशिबानं त्यांच्याकडे फोन होता आणि त्यांनी मला तो वापरू दिला. मी बाबांना कल्पना दिलीय आपण इथे आहोत म्हणून. ते कळवतील तुमच्या आई-बाबांना. चला तर मग आमराईकडे! लेफ्ट-राईट-लेफ्ट!

(साडेतीनला सगळे स्टेशनवर परत आलेत. हसणं-खिदळणं, मस्ती चालू आहे.)

चिनू- आsssहाहा, इथेच ताणून द्यावीशी वाटतेय मला. काय मस्त आंबे होते! ते काका किती चांगले होते ना! त्यांनी आपल्याला चक्क वाट्टेल तितके आंबे खा म्हणून सांगितलं.

मीता- हो ना, कोणी इतकं उदार कसं असू शकतं? बाप रे, कित्ती हसलो आपण! आणि केव्हढी गाणी म्हटली! माझा तर घसाच दुखायला लागलाय. पण मजा आली खूप. तुमच्या लक्षात आलं का, मोबाईल फोन्स नसल्यामुळे आपण एकही फोटो काढला नाही की गाणी लावली नाहीत. मला चक्क पक्षांची किलबिल आणि कोकिळेचं कुहू कुहू ऐकू येत होतं.

अस्मी- मी मस्त सुगंधी हवा भरून घेतली छातीत. काय झुळूझुळू वारा वाहत होता! बेस्ट पिकनिक झाली आजची. माझे शब्द परत घेते मी. विशू, तू पण जरा सॉरी म्हण सुहासला.
ही बघा, आलीच ट्रेन.

(काही दिवसांनी सगळे चिनूच्या दादाला हा अनुभव सांगतात)

दादा- (कौतुकानं) अरे, कसले भारी आहात तुम्ही! तुम्ही चक्क POWER नावाचा जीवनकौशल्याचा फंडा वापरलात!

विशू- हो का? काय असतं ते? आम्ही तर फक्त तावातावानं वाद घातले आणि भांडलो.

दादा (हसून)- मी सांगतो हे काय असतं ते. कुठलाही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हे POWER नावाचं मॉडेल उपयोगी पडतं. यातला P म्हणजे काय प्रॉब्लेम आहे हे शोधून काढणं. O म्हणजे ऑप्शन अर्थात पर्याय. मग हे पर्याय Weigh करायचे, म्हणजे त्यांच्या ब-या-वाईट पैलूंचा आढावा घ्यायचा. पुढचं E म्हणजे Elect आणि Execute, म्हणजे त्यातला योग्य पर्याय शोधून वापरायचा. शेवटचा R आहे Review साठी. आपण निवडलेला पर्याय बरोबर होता का नाही यावर विचार करणं.
बघा, तुम्हांला नाही वाटत तुम्ही तुमच्याही नकळत या पाय-या वापरल्यात म्हणून?

सुहास- अं, पटतंय मला तुझं. जरा बघूयात का? आमचा प्रॉब्लेम असा होता की आम्ही एका अनोळखी जागी चुकून पोचलो होतो. आमच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. काहीजण रागावले, काहीजण रुसले तर काहींना चक्क आनंद झाला. त्यामुळे प्रत्येकानं पर्यायही निरनिराळे सुचवले. उदा. हताश होऊन स्टेशनवरच बसून राहावं, परतीच्या बसची किंवा ट्रेनची सोय करावी, कुणाकडून तरी लिफ्ट घ्यावी किंवा तिथेच कुठेतरी पिकनिक करावी. 

जीतू- पण स्टेशन वर बसून राहण्यानं उलट आम्हांला आणखी वाईट वाटत राहिलं असतं. ताबडतोब परतलो तर पिकनिकच्या मजेवर पाणी सोडायला लागलं असतं. कुणा अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागणंही तसं धोक्याचंच होतं. आणि मोबाईल फोन नसल्यामुळे इंटरनेटचा आधार घ्यायचा प्रश्नच नव्हता. त्यातल्या त्यात सुरक्षित आणि योग्य पर्याय तिथे पिकनिक करण्याचा होता, तो आम्ही निवडला. 

सुहास- हो, आणि नशिबानं आम्ही बाबांना कळवू शकलो, त्यामुळे आमचं टेन्शन कमी झालं. मोबाईल फोन न नेण्याचा निर्णयही शेवटी फायद्याचाच ठरला कारण आम्हांला त्या सगळ्या वातावरणाचा नीट अनुभव घेता आला.

चिनू- एकूण काय, आम्ही परफेक्ट निर्णय घेतले म्हणायचे! एकदम खास झाली आमची पिकनिक.

दादा- हं, आता विसरू नका हे POWER मॉडेल. हा जादूचा मंत्र वापरून तुम्ही कुठल्याही समस्या सोडवू शकता.  मग ते करियर निवडणं असो की परीक्षेची तयारी असो; मित्राशी झालेलं भांडण असो की अगदी आज कुठला ड्रेस घालू असा पडलेला प्रश्न असो.

प्रिय वाचकमित्रांनो, हा आहे तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम. तुम्हांला परीक्षेत अपेक्षेपेक्षा खूप कमी मार्क्स पडलेत आणि आता तुमचे मित्र तुम्हांला भेटायला येणार आहेत. कसं तोंड देणार त्यांना? सांगाल की सांगणार नाही? असेल तर कसं? लक्षात ठेवा, त्यातल्या प्रत्येक पर्यायाची काहीतरी किंमत भरायला लागणार आहे आणि तसेच त्यांचे काही फायदेही असणार आहेत. चालवा डोकं आणि शोधा पर्याय!




  Adolescence and addictions Dr Vaishali Deshmukh Adolescents are all those who are between 10 and 19 years of age. Adolescents are in...